Friday, May 21, 2010

पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना : ह बा

काठभरल्या घागरीतुन
गाळलेल्या वेदना नाचल्या
माहेरभर सांभाळलेल्या वेदना
पीठ आहे अडकुनी जात्यात आरीभर
जरी पाखरे खाऊन गेली
चाळलेल्या वेदना तीच ती भांडी
घरी आहेत तुटकी आजही वाहिल्या
क्रुष्णेत पण खंगाळलेल्या
वेदना मंदिराच्या पायरीवर
काल त्याला पाहिले का बरे मी
टाळल्या कुरवाळलेल्या वेदना
प्रेम दात्या पांढरीची काय ही
जादूग री कोंभ हिरवा प्रसवती
भेगाळलेल्या वेदना
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment