नदी म्हणाली काठाला, 'घे
चुंबुन मजला' ओठावरती ओठ
टेकता तरंग उठला! गाणे रांगत
रांगत आले पायापाशी खिशात
होता जो अनुभव हाती टेकवला!
पहिले चुंबन घेतानाचा हळवा
क्षण तो- आईस्क्रीमसारखा
ओठांवर विरघळला! मजला शोधत
येशिल तर मग वणवण होइल, मलाच
नाही ठाउक माझा पत्ता कुठला!
'बदल अटळ', हे विज्ञानाने
म्हटले जेव्हा, कारुण्याने
बुद्ध जगावर दगडी हसला. कोट
घालुनी काळा येते संध्या दारी
माझ्यावर भरला जातो
स्मरणांचा खटला! - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment