Wednesday, May 26, 2010

दु:ख माझे सोबती ! : प्रशान्त वेळापुरे

दु:ख माझे सोबती ! तू बिलोरी
वेदनांची लालसा आहे ! मी नकोशा
चेहर्‍यांचा आरसा आहे !
सज्जनांना लाभलाहो न्याय हा
अंती मी भिकारी लक्तरांचा
वारसा आहे ! पुंडलीका वीट देवा
तू नको मांडू विठ्ठलाची आस
कोठे माणसा आहे ? फास घ्याया
लागले ते वीर जे होते का
निखारा थंड आता कोळसा आहे ?
बोलली तू 'सोड आता गाव हे माझे ! '
मी तसा सोडून दुनिया छानसा आहे
! दु:ख माझे सोबती अन् सोयरे
होते पण सुखाचा घाव आता खोलसा
आहे ! प्रशांत वेळापुरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2109

No comments:

Post a Comment