Friday, May 21, 2010

गझल : प्रा.रुपेश देशमुख : अमोल शिरसाट

सेकंदाच्या काट्यावरती जिवास
ठेवा जगण्यासाठी एक निरंतर
प्रवास ठेवा. हवा कशाला आनंदी
आनंद नेहमी दिवसाकाठी
दोन्-चार क्षण उदास ठेवा.
लोकहिताच्या सर्व योजना खाउन
टाका कगदावरी दाखवायला विकास
ठेवा. निर्भय होउन लुटून
घ्याव्या सर्व चांदण्या
पायाखाली शहारलेल्या नभास
ठेवा. निरोप घ्यावा तिचा
कोरड्या डोळ्यांनी थोडे कातर,
थोडे हळवे स्वरास ठेवा.
मनातल्या अंगणात छोटे घरटे
बांधा नाव घराचे "आठवंणीचा
निवास "ठेवा. कधी कधी प्रेमळ
शिक्षाही द्यायला हवी एकदा
तरी सावलीमधे उन्हास ठेवा.
प्रा.रुपेश देशमुख
९९२३०७५७४३
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment