Friday, May 28, 2010

माणसाला म्हणे मारते भाकरी! : ह बा

पीक हे घेतले कोणत्या वावरी?
माणसाला म्हणे मारते भाकरी!
मायची आजही सांडते पापणी
गोजिरी केवढी दंगली सासरी
चालला कोण तो? राधिका बावरी
गोकुळी एकटी वाजते बासरी
लोकशाही तुझे लेकरू बाटके
नोकरा आज ते माग ते चाकरी काल
सत्ते घरी खेळ मी पाहिला भाउजी
भोंगळा मेहुणी लाजरी झाड मी
वाढलो कातळाच्या उरी वेल तू
मखमली खेळ खांद्यावरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment