पांडुरंगा का भक्त आज सलतो
भगतास पांडुरंगा ? का देव आज
दिसतो धनिकास पांडुरंगा ?
अधिकार श्रेष्ठ ज्यांचा
अध्यात्म सांगण्याचा तो का
सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?
ही सावली मठांची ढोंगी पुन्हा
निघाली ना किर्तनासी यावे
तूर्तास पांडुरंगा ! पाण्यात
कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास
पांडुरंगा ! कुठल्या मुखात
गाथा ? कोठे अभंग आता? जो तो
लाबाड हसतो संतास पांडुरंगा !
आता युगायुगांची चर्चा कशास
व्हावी प्रत्येक क्षण तुझा मज
आभास पांडुरंगा ! प्रशांत
वेळापुरे पंढरपूर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2081
Tuesday, May 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment