Tuesday, May 25, 2010

तरी समुद्रा तुझ्या किनारी : बेफिकीर

*लाटांनी येऊन शरण लोटांगण
घेणे संपत नाही तरी समुद्रा
तुझ्या किनारी पुर्वीइतके
करमत नाही सोसाट्याचा वारा
हिरव्या पानांनाही घेउन जातो
असे वाटल्याने दबलेली नवी
पालवी उमलत नाही चौकामध्ये
गाडी पुसुनी टकटक करते पोर
भिकारी खिशातून रुपया काढेतो
लाल बावटा राहत नाही अजून बसते
तिथेच अमुच्या लहानपणची
भाजीवाली मुलगा पिऊन मेला,
नातू, सून कुणीही फिरकत नाही
वनवेवर एकाच दिशेने जात राहती
गाड्या सार्‍या तरी त्यात
आवाज कशाला होतो काही समजत
नाही पावसात छत्री वागवतो,
उन्हाळ्यामधे टोपी असते इतके
सांभाळुनही डोके ऐन प्रसंगी
चालत नाही 'बेफिकीर'
तब्येतीसाठी औषध, पाणी, पैसा
आहे एक वेळ येतेच म्हणे जेव्हा
हे काही चालत नाही *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2103

No comments:

Post a Comment