लिहिताना मी माझा नसतो
लिहिल्यावर कवितेचा नसतो
फक्त खोल जा, नकोस शोधू, कधीच तळ
मौनाला नसतो गरज घराची त्याला
कळते कुठेच ज्याला थारा नसतो!
प्रत्येकाचे रूप वेगळे...
फळा-फुलांचा साचा नसतो!
इच्छांमागुन येती इच्छा... पण
तुटणारा तारा नसतो... गंधांनी
या काय करावे? कुठेच जेव्हा
वारा नसतो? मिठीत तुझिया
विरघळल्यावर... मी इथल्या
विश्वाचा नसतो! शब्दांमधुनी
पडते विष्ठा काळ मला पचलेला
नसतो! - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2082
Monday, May 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment