Sunday, May 23, 2010

उधाणलेला समुद्र.... : जनार्दन केशव म्हात्रे

उधाणलेला समुद्र, आपण पाहत
असतो खोल-खोल दु:खाने तो
फेसाळत असतो मोजत असशील तू ही
लाटांमागून लाटा संथ किनारा
असा न केव्हा जागत असतो सोसुन
दु:खे युगां-युगांची
विसावण्यास्त्व
किनार्‍याकडे एकसारखा धावत
असतो भीषण वादळ क्षणात देतो
उठवुन तरिही क्षितिजाशी तो
किती दयेने वागत असतो
माझ्यामध्ये सुद्धा... एक
समुद्रच आहे वादळ घेवुन सदैव
जो घोंगावत असतो
ह्रदयामधल्या आलेखाची नोंद
असावी ध्यास आपला किती-किती
उंचावत असतो -जनार्दन केशव
म्हात्रे म्हात्रे निवास,
गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी:
९३२३५५५६८८
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment