अथांग सागरासही तुझी तहान
लागली तुला मनातुनीच मी अबोल
साद घातली अजून मागते रुपेरी
रेत पावले तुझी थव्यांतल्या
खगांस आज ओढ लागली तुझी वनांत
झावळ्यांस द्यायची तुलाच
सावली दुरून शोभिवंत संधिकाल
हा खुणावतो तुझीच आस बाळगून
सूर्य अस्त पावतो करावया
तुलाच स्पर्श लाट येऊ राहिली
सखे गं सांग ना आता करेल काय
चांदवा तुझ्याविना न येऊ
पाहतो हवेत गारवा तुझीच वाट
पाहती अजून शंख-शिंपली तुझाच
ठाव सारखा विचारतोय चंद्रमा
तुलाच आज शोधतात बावरून
चांदण्या (प्रिये तुला
पाहायलाच रात्र आज जागली!) -
योगेश्वर रच्चा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, May 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment