Wednesday, July 14, 2010

एक उदासी खोलीभर.. : ज्ञानेश.

==================== एक उदासी खोलीभर
दरवळत राहते जणू रक्तामध्ये
दु:ख तुझे विरघळत राहते जणू
सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत
राहतो गळा चारित्र्याची
धुतली कॉलर मळत राहते जणू घरात
एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत
राहते जणू एक अनामिक हुरहुर
आहे शिल्लक कोठेतरी
शेपुटतुटकी पाल कुणी वळवळत
राहते जणू जुन्या डायर्‍या
कपाटामधे अशा नांदती अता
विस्कटलेल्या त्या वर्षांची
चळत राहते जणू दिसू लागली आहे
आयुष्याची तिसरी मिती
पुर्वग्रहांची भिंत उभी
कोसळत राहते जणू.. संध्याकाळी
चिंतेने ते काळवंडते असे, माझे
दुखणे नभास अवघ्या कळत राहते
जणू कणाकणाने संपत जातो माझा
चांगुलपणा सून कुणाची घरात
अपुल्या जळत राहते जणू ! . . .
-ज्ञानेश. =======================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2220

No comments:

Post a Comment