नवे नसे रे प्याद्याचेही वजीर
होणे कितीकदा पाहिले नृपाचे
फकीर होणे गिळून एकच घोट
विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला
कणाकणाने बधीर होणे? तुला
सदोदित आळविले मी
स्वार्थासाठी, मला न जमले मीरा
होणे, कबीर होणे! असे तसे हे वेड
नसे, भलतेच पिसे हे, क्षणात
संयम, क्षणात व्याकुळ, बधीर
होणे घुमे विठूचा घोष, पंढरी
दुमदुमताना तनामनाचे गुलाल,
बुक्का, अबीर होणे! स्वतःस
उधळुन द्यावे अन् मनमुक्त
जगावे, किती सुखाचे असेल वेडा
फकीर होणे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, July 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment