Thursday, July 22, 2010

धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा.. : कैलास गांधी

उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष
आहे कार्यकर्ते ठेंगणे नेते
खुजे पण कीर्ती त्याची फार
मोठा पक्ष आहे धान्य हा तर
दारूसाठी माल कच्चा तुस कोंडा
माणसाचे भक्ष आहे देवघेवीचे
चला बोलून टाकू त्याचसाठी
आतला हा कक्ष आहे शोभते ओठी
तुझ्या अस्सल शिवी पण या
तुझ्या हातात तर रुद्राक्ष
आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment