Saturday, July 17, 2010

कर्जमाफीच्या आमिशावर अशी माजली शेते : कैलास गांधी

कर्जमाफीच्या आमिशावर अशी
माजली शेते पाउस पडला नाही
तरीही पिक भुकेचे येते
कुपोषणाचा अर्थ कळाया
उपोषणाला बसली मातीच्या
गर्भात अकाली जन्म जाहली शेते
किती गचकली पाण्यावाचून गणती
कोणी केली संख्या फुगवून
सांगत गेले किती वाचली शेते
अनुदानाच्या थापा ऐकून अता
शहाणी झाली किती कुणाचे टक्के
असतील शोध लावती शेते
युगायुगांची कासावीस अशी
वळवाने सरते का? रक्ताचे मग
पाणी करुनी आम्ही शिंपली शेते
.........कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment