कर्जमाफिच्या आमीशावर अशी
माजली शेते पाउस पडला नाहि
तरीही पीक भुकेचे येते
कुपोषणाचा अर्थ कळाया
उपोषणाला बसली मातीच्या
गर्भात अकाली जन्म जाहली शेते
किती गचकली पाण्यावाचून गणती
कोणी केली संख्या फुगवून
सांगत गेले किती वाचली शेते
अनुदानाच्या थापा ऐकुन अता
शहाणी झाली किती कुणाचे टक्के
असतील शोध लावती शेते
युगायुगांची कासावीस अशी
वळवाने सरते का? रक्ताचे मग
पाणी करुनी आम्हि शिंपली शेते
.........कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2238
Saturday, July 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment