किती सोपे मला हे प्रेम करणे
वाटले होते.. सुखाचे स्वर्ग
छोट्याशा सुताने गाठले होते!!
नशा, धुंदी, खुमारीने किती
सांगू मला छळले.. मनाच्या
अंगणी वादळ तुझे सोसाटले
होते!! मनाच्या ह्या कुरापाती
स्वभावाला करू शिक्षा??
नको!..तेही तुझ्या हळव्या
स्मृतींनी दाटले होते!! तुझ्या
"निष्काम" प्रेमाच्या वदंता
ऐकल्या जेव्हा... तुझे "ते" शब्द
कुचकामीपणाचे वाटले होते.
जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील
का वेडे..? तुझ्या दारी 'तगादे'
हुंदक्यांचे साठले होते!! --
बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, July 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment