Saturday, July 17, 2010

नाबाद : बहर

रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!
चांदणे होते तुझे की सांग
माझे? एवढ्यासाठीच का हा वाद
होता?? वेल होती, एक वेडे फूल
होते... बाग माझाही कधी आबाद
होता! लाच द्यावी लागली माझ्या
जीवाची.. लाच घेणारा कसा
वस्ताद होता!! खेळ हा कुठला
रडीचा खेळला तो?? हारला होता,
तरी नाबाद होता!! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment