Monday, July 19, 2010

आरसा पाहायचा राहून गेला : निलेश कालुवाला

आरसा पाहायचा राहून गेला
चेहरा निरखायचा राहून गेला
यायची वचने फक्त मजला मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला मी
कधीना पालखी कवितेस केली शब्द
हा मिरवायचा राहून गेला न्याय
मिळला ना कधी मज, तर कधी हा
फैसला लागायचा राहून गेला रे
जगी देवा तुझ्या सारेच होते
कोण तो राहायचा राहून गेला
माहिती झालो न मी केव्हा
कुणाला ढोल हा बडवायचा राहून
गेला गझल तू केली पण सफाई न आली
नूर तो गवसायचा राहून गेला
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2248

No comments:

Post a Comment