धावताना तोल गेला..ठेचकाळत
राहिलो दूर ती गेली तरीही मी
खुणावत राहिलो प्रश्न हा
फिजूल आहे शब्द हे बेचव कसे
पूर्ण चोथा होईतो जर अर्थ चावत
राहिलो दक्षिणेसाठी खरेतर
देव त्यांनी पूजिला जन्मभर
त्यालाच पण मी देव समजत राहिलो
प्रश्न हे बोथट जणू कि, तीष्ण
आली उत्तरे बुद्धीच्या
निसण्या वरी मग प्रश्न घासत
राहिलो बदलले हंगाम तरी पण खोड
नाही सोडली त्या तुझ्या
इवल्या तळ्याशी रोज बरसत
राहिलो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment