Tuesday, July 20, 2010

शक्य नाही : स्नेहदर्शन

तुला मी भेटणेही शक्य नाही असे
मी राहणेही शक्य नाही मनातिल
स्वप्न माझे व्यर्थ आहे तिला
मी पाहणेही शक्य नाही असा मी
कायदा केला स्वतःशी मला तो
तोडणेही शक्य नाही कुणी मज
ओळखावे वाटते पण मला, मी
वाचणेही शक्य नाही कुठे शोधू
मला मी सापडेना तिला मी
मागणेही शक्य नाही कसे आहे पहा
हे विश्व माझे जरासे हासणेही
शक्य नाही ---स्नेहदर्शन
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2255

No comments:

Post a Comment