*आसवे आता न केवळ गाळती माझे
नयन * आसवे आता न केवळ गाळती
माझे नयन वेळ येता विश्व सारे
जाळती माझे नयन तीक्ष्ण ज्या
बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती
माझे नयन बंधनी मज ठेवण्या
केले कितीही कायदे, फक्त
माझ्या कायद्यांना पाळती
माझे नयन शुष्क झाले दु:ख इतके
पचवुनी ' हे' की अता आसवे कुठली
कशाला ढाळती माझे नयन ? आज का
''कैलास'' डोळे राहुनी तू आंधळा ?
मोतीबिंदूगत सया सांभाळती
माझे नयन. डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2251
Tuesday, July 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment