Wednesday, July 14, 2010

अंगार चित्तवेधी : गंगाधर मुटे

*अंगार चित्तवेधी* दे तू मनास
माझ्या आकार चित्तवेधी नजरेत
गुंतणारा आजार चित्तवेधी ती
बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार
चित्तवेधी नाहीच राग येतो,
वाटे हवाहवासा कानास पीळणारा
फ़णकार चित्तवेधी आभाळ
गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार
चित्तवेधी दु:खास मांडणारे
बाजार फ़ार झाले दु:ख्खा
खरेदणारा बाजार चित्तवेधी
आप्तास कौतुकाचा वर्षाव ही
प्रथाची इतरांस गौरवे तो आचार
चित्तवेधी आगीत खेळतांना,
सुर्यास छेडतो मी कोळून पी
'अभय' ती अंगार चित्तवेधी
गंगाधर मुटे ---------------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment