Thursday, July 15, 2010

गझलेत काय सांगू? : बहर

गझलेत काय सांगू?..(सांगायचेच
होते!) होता किती जिव्हाळा! (पण
जाच तेच होते!) कां भेटलो तुला
मी?...ते आजही कळेना! आभास ते
म्हणू मी? कि ते खरेच होते? माझा
कधीच नव्हता, ताबा मनावरी
ह्या.. ते बंध खेचलेले..सारे
तुझेच होते!! सांगू किती
कुणाला..मी काय सोसले ते.. तो
भूतकाळ होता... ते ही जुनेच
होते!! आता सुखात बसतो, गाळून
आसवांना.. जे मीठ काढले ते..बरणी
मधेच होते!! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2231

No comments:

Post a Comment