Saturday, July 17, 2010

चांदण्या लेऊन झाला... : ह बा

अंगणी ये कुंतलांना खेळु दे ना
वारियावर गंध झाले शब्द सारे
दरवळूदे या नभावर एकटा नाही
तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र
केव्हाचा अनावर बाग होती वेल
होती पण बहर नव्हतेच येथे ही
फुले उमलून आली काल तुजला
पाहिल्यावर आज मी गाईन तुजला
पाहिजे ते सांजगाणे दाद तू
देशील का पण शब्द सारे
संपल्यावर? मी घडीभर बोललेलो
आसवांशी सांत्वनाचे बोल माझे
घेतले भलतेच दु:खानी मनावर -
ह्.बा.शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2235

No comments:

Post a Comment