फक्त सुखाची किंमत बघून आलो मी
दु:खाशी सौदा करून आलो उत्तर
म्हणजे जबाबदारी असते म्हणून
केवळ प्रश्नच बनून आलो हळवी
वळणे आता विसरत आहे आज
तुझ्याही दारावरून आलो तूच
ठरव मी आवडलो का तुजला? मी
हातांच्या रेषांमधून आलो
आठवणींचा पाउस बरसत होता
अश्रूंमध्ये पुरता भिजून आलो
त्यांच्यापाशी पैसे रग्गड
होते म्हणून त्यांना स्वप्ने
विकून आलो - नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2227
Wednesday, July 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment