कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू तू
अता बघशील वाताहत खरी लागले
पाणी पुराचे ओसरू गायही
तेव्हाच पान्हा सोडते लागते
जेव्हा लुचाया वासरू पटवती
साऱ्या पुरातन ओळखी कुठुन हे
आले नवे माथेफिरू ? खुळखुळाया
लागले अश्रू किती ! केवढे
लिहितोस तू गल्लाभरू साठवू
इतके सुगंधी सल कुठे ? आठवू
कोणास, कोणा विस्मरू ? ---------कलम
1----------------- खूप नक्षीदार आहे शाल
पण एकमेकांनाच आता पांघरू
आपल्या दोघांमधे कोणी नको ये
मिठी नेसू, तिची वस्त्रे करू
पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ? ओठ,
डोळे, केस, बाहू, हनुवटी (हे करू
की ते करू की ते करू)
------------------------------------------------------------------------------
1. उर्दू किंवा फारशी गझलेत
कवीला एखादे मुक्तक (चार किंवा
त्यापेक्षा जास्त ओळींचे) तर
तेव्हा त्या ओळींच्या वर
किंवा मध्ये किंवा दोन
ओळींच्या मधल्या मोकळ्या
जागेत तिथे क़ाफ़ हे चिन्ह
ठेवून खालील ओळी ह्या
एकत्रितपणे वाचाव्यात, असा
कवी निर्देश करतो. मराठी गझलेत
ही पद्धत राबवायची असल्यास
मला कलम हा शब्द किंवा क हे
अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम
ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा
करणे किंवा पाडणे. आणि दुसरा
अर्थ ग्राफ्टिंग असाही आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2240
Saturday, July 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment