Friday, July 16, 2010

वाटते बोलायचे राहून गेले : कैलास

*वाटते बोलायचे राहून गेले*
आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले
हे फुकट आहे कळाले त्यांस
जेव्हा, पोट भरलेले,तरी खावून
गेले विश्वसुंदर स्त्री करी
अद्भूत किमया आंधळे आले ,तिला ''
पाहून '' गेले मतलबी झालो इथे
मी, काल जेव्हा आप्त माझे पाठ
मज दावून गेले माफ केले पाप ते
सारे तुझे मी आसवांसमवेत जे
वाहून गेले पक्ष कसले?काय्?हे
कळते न ज्यांना, आपला झेंडा
इथे लावून गेले जाहले '' कैलास ''
सारे सांगुनी पण, वाटते,''
बोलायचे राहून गेले '' डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment