*घट अमृताचा* लपेटून चिंध्यात
घट अमृताचा, न देखे कुणीही,
शिवेना कुणी लपेटून धोंड्यास
शेंदूरवस्त्रे, अशी होय गर्दी,
हटेना कुणी किती वाटले छान हे
गाव तेंव्हा, जरासा उडालो
विमानातुनी इथे मात्र मेले
कुणीही दिसेना, तरी का तजेला
दिसेना कुणी? विषा प्राशणे
सर्वथा गैर आहे, तया बोलती जन
समजावुनी परी कारणांचा जरा
शोध घ्यावा, अशी सुज्ञता
दाखवेना कुणी समाजात या
हिंस्त्र भाषा नसावी, नसो
स्थान लाठी व काठीस त्या परी
या मुक्यांची कळे भाव-भाषा,
असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी?
भरारीस उत्तुंग झेपावतो मी,
कवी कल्पनेला अभय गाठतो परी
वास्तवाने घरंगळत येता, उरे एक
भूमी दुजे ना कुणी गंगाधर मुटे
...........................................................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, July 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment