*............................ प्रदेश...
............................* द्यायचा किती
स्वतःस त्रास आणखी ? व्हायचे
कसे, किती उदास आणखी ? एवढ्यात
थांबली कशी तुझी कथा ? तू
लिहायला हवेस खास आणखी ! शोधले
तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ? ये
अजून, ये अजून, ये, समीप ये...
अंतराय फक्त एक श्वास आणखी !
जीवना, शिकायचे अजून मी किती ?
लांबणार का उगाच तास आणखी ?
वागतो तुझ्यासवे नमून मी जसा...
वाढते तशी तुझी मिजास आणखी !
जायचे अजून मी पुढे पुढे किती ?
लागतो प्रदेश हा भकास आणखी ! *-
प्रदीप कुलकर्णी*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Tuesday, July 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment