चंद्र दुपारी दिसतच नाही... असे
नव्हे मनासारखे घडतच नाही...
असे नव्हे जरी जगाला सदैव मी
हसरा दिसतो मला जिंदगी छळतच
नाही... असे नव्हे तशी तर मला
रोजच कविता सुचते... पण - तिला
कधी मी सुचतच नाही... असे नव्हे
नको बाळगू गर्व फुका
तारुण्याचा नवी पालवी झडतच
नाही... असे नव्हे चुकलो मीही
असे वाटले... वाटेला वाट कधीही
चुकतच नाही... असे नव्हे किती
काळ सोसेल चेहर्यांना तोही
पारा त्याचा चढतच नाही... असे
नव्हे गूढ, स्तब्ध, एकाकी
दिसते जरी तळे तरंग नकळत उठतच
नाही... असे नव्हे झोकुन देणे
जमले की सारे जमते जगण्याचा तळ
मिळतच नाही... असे नव्हे खंत
कशाला कपड्यांवरच्या
डागांची? निळे वस्त्रही मळतच
नाही... असे नव्हे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2254
Tuesday, July 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment