Monday, July 19, 2010

पुढे सरू की जाऊ मागे... : वैभव देशमुख

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय
करू ? इथेच झोपू की एखादे घर
शोधू ? वहीत आहे काही पत्ते काय
करू ? पुढच्या थांब्यावरती
उतरुन जाशिल तू तुझ्यासवे मी
बोलुन खोटे काय करू ? रद्दी
सारी विकून आलो बाजारी आता हे
कवितांचे गठ्ठे काय करू ? तुझी
आठवण बिलगुन या ब्रम्हांडाला
तुझ्यासारखे दिसते सारे काय
करू ? सत्य दाटले पेनाच्या
टोकावरती... पुढ्यात आहे कागद
कोरे काय करू ? - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2236

No comments:

Post a Comment