Sunday, July 18, 2010

शाप : अस्मित@

ते क्षण तेव्हाचे, झेलता मला
आले नाही. दुःख माझेच होते, पण
पेलता मला आले नाही. साऱ्या
गोष्टीचा बाऊ होऊन, त्या मला
हसून चिडवतात. माणूस असून सारे
काही, करता तुला आले नाही.
निसर्ग आणि देवही हसतो, माझ्या
अश्या शांततेवर. सारे काही
देऊनसुद्धा, आनंद लुटता तुला
आला नाही. उसळतात मग लाटा
जेव्हा, तरीही मी शांतच असते.
चंद्र मिश्कील हसून बोलतो, शाप
माझा होता हेही सांगता तुला
आले नाही.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment