जरी उभा चांदण्यात आहे तरी
उन्हाळा उरात आहे लग्न मोडते
ज्याचे नेहमी त्याच्या दारी
वरात आहे सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे
स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे ते आता
घडणारच आहे जे काळाच्या मनात
आहे आता जरा मी लबाड झालो पुरी
सचोटी कुणात आहे विकणे होते
कधीच मंजूर घासाघीस तर दरात
आहे लढण्याची खरी हिम्मत नाही
म्हणे दोष या कण्यात आहे
फाशीला जन्मठेप मिळते तशी सुट
कायद्यात आहे रस्ता त्याचे
आहे अंगण छप्पर ज्याचे कनात
आहे ओलांडाया वेळ लागतो
उंचवटा उंबऱ्यात आहे
पुतळ्यासाठी प्रसिद्ध झाला
आता तो धूळखात आहे रामाचा
वनवास संपला सीता अजुनी वनात
आहे उघड सांगती कविता माझ्या
दडून जे काळजात आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, July 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment