ज्याच्या नाराजीने सध्या
नवीन वादळ उठले होते हे शोधा
कि आधी त्याचे किती जणांशी
पटले होते बाग जरा नाखुशच होती
फुलांनीच समजोता केला नव्या
ऋतूंची वाट पाहुनी रंग
फुलांचे विटले होते पाय मोकळे
झाल्यावरती उभा राहिला नवाच
गुंता सुटे, मोकळे
होण्यामध्ये हात जरा गुरफटले
होते पुसू नका आरसे उगाचच
तोंडावर मारत जा पाणी रोज
नव्या रंगानी मुळच्या
चेहऱ्यांना बरबटले होते
जीवानिशी जे गेले त्यांच्या
मृतदेहांना नाही वाली लाड
तयांचे झाले ज्यांना थोडेसे
खरचटले होते धीर कधीना खचला
तरीही या सत्याची जाणीव झाली
शरीर थोडे थकले होते... पाय
जरासे दमले होते ....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment