Sunday, July 18, 2010

शेर शेवटाचा : अवधुत

शेर शेवटाचा जे कधी कळले न
मजला ते कळाया लागले चींब त्या
थेंबासही आसू कळाया लागले
थांबले खंबीर मनही येवूनी
वळणावरी पाहता तुजलाच पाठी ते
वळाया लागले सांडला प्राजक्त
होतो त्या तुझ्या मी अंगणी
सांडणे मज व्यर्थ माझे ते
छळाया लागले खोड करुनी
चंदनाचे घासले मजलाच मी दुःख
झाले श्वास का ते दरवळाया
लागले बाण झाले चांदणे नि
टोचले हृदयांतरी सोसता काळीज
का ते कळवळाया लागले शाईतले हे
घाव माझे मांडले नेहमीच मी
वाचता ज्यांनी दिले ते
हळहळाया लागले शेवटाचा शेर का
हा मागतो मजलाच मी रक्त हि
हृदयास उसवून ओघळाया लागले
अवधूत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment