वाटते व्हावे न केव्हा,तेच
झाले शेवटी सांत्वनाला
माझिया,शत्रूच आले शेवटी हाव
केली त्या क्षणी,काही मला ना
लाभले निर्विकारी जाहलो,सारे
मिळाले शेवटी लोक
दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले
शेवटी भिस्त माझी खास
होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले
शेवटी देतसे व्याख्यान
दारुबंदि वरती जे कुणी, पाहिले
त्यांच्याच मी,हातात प्याले
शेवटी भार मी वाहून
ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले
शेवटी जन्म गेला हा तुझा ''
कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले
शेवटी ? डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, July 31, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment