Tuesday, July 6, 2010

मी तुझा : अजय अनंत जोशी

धुंद एकांत होता भेटलीस
जेंव्हा
प्रीतीच्या फुलांतुनी
झिरपलीस जेंव्हा

बाग येथे बहरली तुझ्या
श्वासातुनी..
गंध माझा घेऊनि नाहलीस
जेंव्हा

स्वप्न झाले पूर्ण ते तुला
जिंकायचे..
देह बाहूंत माझ्या हारलीस
जेंव्हा

मी तुला त्या सकाळी ओळखून
गेलो..
दर्पणा पाहून तू लाजलीस
जेंव्हा

दिवस गेला व्यर्थ अन् रात्र
आक्रंदली..
मागल्या पावली तू चाललीस
जेंव्हा

थक्क झाल्या चांदण्या, लाजला
चंद्रही..
रात सारी इरेला पेटलीस
जेंव्हा

मी तुझा... तुझाच होत भारलो
क्षणातच..
'मी'पणाची कात तू टाकलीस
जेंव्हा

'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/868

No comments:

Post a Comment