Thursday, July 1, 2010

हळूहळू त्या व्यापत गेल्या सगळे मन... : प्रणव.प्रि.प्र

हळूहळू त्या व्यापत गेल्या
सगळे मन आठवणी असती जणू,
व्हायरस ट्रोजन. जीव घेतला
त्यांनी सगळ्या अर्थांचा
करती केवळ शब्दांवर ते संशोधन!
अजून नाही दिसावयाचे सत्य
तुला... अजून नजरेवरती आहे
संमोहन... स्तेथस्कोप लावुन
कानी, मी शांतपणे- प्रत्येक
क्षणाचे ऐकत बसतो स्पंदन. येते
दुनिया जशी जशी माझ्या जवळी
त्या वेगाने होते माझे आकुंचन.
उगाच नाही ओठ निळे काळे झाले
करकचून घेतो अनुभव माझे चुंबन!
- प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2195

No comments:

Post a Comment