Saturday, July 10, 2010

पांगळया आमुच्या व्यथेला : योगेश घाडिगा्वकर

पांगळया आमुच्या व्यथेला,
रांगण्याची ओढ़ नाही बेफाम या
धावणाऱ्या, मुजोरीस तुमच्या
तोड़ नाही ते करिती ही लूटालूट,
तरी आम्ही चोरटे? अजब या
उखाण्याची आम्हास फोड़ नाही
शर्यतीत या धावण्याच्या, तेच
घोड़े जिंकणारे बेईमान या
शर्यतीची, आम्हास खोड नाही
फाटली जरी आतडी, ही रोजच्या
भुकेने शेलटया या
सांत्वनांची, आम्हास ओढ़ नाही
घालुनी दरोडा ते, जोड़ती एक एक
पैसा वेशीवरी विखुरल्या
आमुच्या, लक्तरांस जोड़ नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment