Thursday, July 1, 2010

वेदना : अनिल रत्नाकर

कोती असे वेदना कोनाड्यातली
लोभी असे वेदना हो माझ्यातली
ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली
स्पर्शेच आकाश माती वा-यातली
का वाहतो वेदना तो नात्यातली?
ना लागतो ठाव हा ऊंची गाठुनी
वाजे वृथा वेदना झोपाळ्यातली
का मारशी तीर जहरी पाठीवरी?
कुरवाळतो वेदना तो भात्यातली
जा, द्ळु नको, गोष्ट आज
चव्हाट्यातली पिसलीच ती
वेदना हो जात्यातली बेभान
झाली पिढीच निराशेत ती जिद्दी
असे वेदना पोवाड्यातली काडी
जरी मी असेच खराट्यातली वाहे
अनिल वेदना सोसाट्यातली ...........
रंगात ते खेळ काळे आयुष्यभर ही
रातच सफेद ना घोटाळ्यातली का
बाळगू ह्या व्यथांना पोटात मी?
फांदीस त्या वेदना हो
काट्यातली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2197

No comments:

Post a Comment