एकेक जमा झाल्यावर त्यांचा गट
झाला गढी बांधली गेली,
त्याभवती तट झाला! दुखले नाही,
रक्त न आले, रडू न आले गेंडा
झाला तो, की चाकू बोथट झाला? आला
तेव्हा किती गडद रंगाचा होता-
हळूहळू काळाच्या ब्रशने
फिक्कट झाला. मोबाइलच्या
इनबॉक्समधे प्रश्न उजळतो-
'अपुल्यामधला संवाद कशाने कट
झाला?' उभ्या राहिल्या आज जिथे
भक्कम बिल्डिंगा काल तिथे
काही स्वप्नांचा शेवट झाला!
डोळ्यांच्या काचेवर पडले दव
अश्रूंचे... अस्ते अस्ते रंग
जगाचा फिक्कट झाला... वणवण
करुनी, पतंग पडला ज्योतीवरती
त्याच्या शोधाचा शेवटही
उत्कट झाला! एकांताचा ठिपका
पडला शहरावर, अन् - दिसू नये
दृष्टीला इतका पसरट झाला! -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2203
Wednesday, July 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment