Saturday, May 1, 2010

फितुर : काव्यरसिक

*फितुर*
--------------------------------------------------------------------------
कोण होते सोबतीला, कोण मागे
दूर होते? भेटले वाटेत जे, सारे
फितुर होते.... भान माझ्या
आपल्यांना माझे असे होते कुठे?
आपल्या धुंदीत ते मश्गुल अन्
मग्रूर होते... धावलो काळासवे
मी घेवून मागे लोढणी, जाणले
दैवास आता काय जे मंजूर होते...
आपल्यांनी घात केला अन् खरे
जाहीर झाले, ओळखीचे चेहरेही
केवढे भेसूर होते... ऐकले माझे
जगाने सारखे बेसूर गाणे, एकटा
मी गात होतो दिव्य माझे सूर
होते...
------------------------------------------------------नचिकेत
भिंगार्डे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment