*का सूर नवा हा छेडत जाते
भासांची वीणा?* तो आला तो गेला
हे मी मुद्दाम म्हणत असते... तो
मला भेटला नाही हे कोठे सांगत
असते? का सूर नवा हा छेडत जाते
भासांची वीणा? येशील कधी तू ते
या हृदयाला उमजत असते हा कसा
शिशिर आहे ते आकळेना मलाही पण
त्याच्यासाठी मी शब्दांची
पाने उगवत असते टळले नाही
कोणाचे उंचीवरून गडगडणे तो
तारा आहे कळले , मी जपून वागत
असते काय आहे तुझ्या मनात ते
मला का कळत नाही ? पण फूल कधी
वार्यालाही दिशा विचारत
असते! सांगत नाही सत्य कधी मी
कारण मनास त्याने खोटे खोटेच
तरी पण काय छान वाटत असते
काळजी वाढते आहे या
वाढणार्या धुळीने... बाई पहा
कशी ती पण.. नेहमीच झटकत असते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, May 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment