सत्य आयुष्या अता पचवायला हवे
सख्य माझ्याशी तुला जमवायला
हवे ऊठ आता जाग तू निद्रिस्त
भारता स्वप्न मरणासन्न हे
जगवायला हवे चांदण्यांचे
दागिने मोडीत काढुनी मी तुला
अन तू मला मिरवायला हवे सांग
का आहे पुरेसे भिंत पाडणे?
आपल्यामधले चिरे बुजवायला
हवे हे कसे कोठार?... होते सारखे
रिते खाद्य मेंदूला नवे
पुरवायला हवे भंगला एकांत...
जमले केवढे बघे आपले भांडण मना
मिटवायला हवे ह्या व्यथेने
त्या व्यथेशी नाळ जोडली सूत
दोघींशी मला जुळवायला हवे
पेरले आहेत मी पैसे चहूकडे पीक
सौख्याचे अता उगवायला हवे वेळ
नाही चेहरा वाचायला तुला
कंप्युटरला लाजणे शिकवायला
हवे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2063
Thursday, May 6, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment