Monday, July 12, 2010

ती इतकी करारी वाटते : निलेश कालुवाला

दोस्ता तुझी सार्‍यांबरोबर
फार यारी वाटते तू वेगळे अन
वागले की मग गद्दारी वाटते
इतकी सवय जडली मनाला कुंपणी
राहायची ओलांडले हे घर जरा की
हद्दपारी वाटते गाती फुलांचे
गोडवे फांदी उपेक्षित राहते
चाले जगी हे नेहमी त्याची
शिसारी वाटते ती वागते तेव्हा
अशी आभाळ कोसळले तरी मी बैसतो
निश्च्चिंत ती इतकी करारी
वाटते जे अनुभवाने जाणले ते
सांगतो दोस्ता तुला असते जरा
त्याहून 'ती' जितकी विचारी
वाटते निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment