Sunday, July 11, 2010

जुने पेच ते..... : बहर

जुने पेच ते पेश होती नव्याने..
पुन्हा खालती पाहिले त्या
दिव्याने! विसंबू नको, ना
दिव्यांचा भरवसा.. दिलासा दिला
हा, मला काजव्याने! असे
मृत्यूचा शाप ह्या मीलनाला...
तरी का जळाले..पतंगे थव्याने??
मला एकही शब्द सुचला न तेव्हा...
(कसे व्यक्त केलेस तू
हुंदक्याने???) बरे ताट माझे,
रिकामेच होते.. किती दु:ख हे
वाढले वाढप्याने!! जिथे पिंड
असती... तिथे कावळेही.. तिथे का
घुमावे..उगा पारव्याने?? बहर
येत होते... बहर जात होते...
फुलांनाच
नाकारले..ताटव्याने!!! --- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2211

No comments:

Post a Comment