Wednesday, July 7, 2010

'' बरे दिसत नाही '' : कैलास

'' बरे दिसत नाही '' गुडघ्यावरती
तुझे रांगणे ,बरे दिसत नाही
पुन्हा पुन्हा हे तुला
सांगणे,बरे दिसत नाही '' 'गझल'
न्यायची पुढे'' तू हे खुंटीला
बांधून घे स्वता त्याच खुंटिस
टांगणे,बरे दिसत नाही पृथ्वी
फिरणे,सूर्य
उगवणे,तुझ्यामुळे नाही वेळि
अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत
नाही चौकट '' बाराखडी''
आपली,समजुनी घे इतुके
चौकटितुनी दूर पांगणे,बरे
दिसत नाही प्रणयासाठी
चित्तही चळते,दुनिया हे जाणे
तुझे त्यात असले लोटांगणे,बरे
दिसत नाही खळखळाट करणारा साधा
झराच तू आहे तुडुंब दर्यागत
अथांगणे ,बरे दिसत नाही किती
किती पाहिली उधाणे,ह्या ''
कैलासा''ने त्यामधले हे तुझे
भांगणे,बरे दिसत नाही.
डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment