मनाची आग कोठे शांतवावी कुठे
जाऊन चादर अंथरावी फरक ना
आमच्यामध्ये जरासा कशी मी जात
त्याची ओळखावी मनाचे मोल ना
काहीच येथे कुणाला आपली भाषा
कळावी शहर परके , न कोणी ओळखीचे
कुठे ही रात्र आता घालवावी
मिळो संवेदनेचे दान तुजला
तुला ही वाट माझी सापडावी.........
अनंत ढवळे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/185
Wednesday, July 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment