'' तीळ'' जीव घेणारा तुझ्या
ओठांवरी जो तीळ आहे दोष
डोळ्यांचा,फुकाचा काळजाला
पीळ आहे. सप्तरंगी बोलपट
तू,वेड तुज सर्वत्र आहे ''मी''
,कुणी बघणार नाही,तो डब्यातील
रीळ आहे मी मुळी चावट न
किंतु,दर्शनी तव कोण जाणे, का
निसटते माझिया ओठांतुनी ही
शीळ आहे मी कसा मिळवू तुला?
नवकोट श्रीमंती तुझी अन मी
भिकारी सदन माझे,उंदराचे बीळ
आहे. हा गुलाबी प्रेमज्वर
की,पीतज्वर मुळचा तुझा हा?
प्रेम झाले की तुला '' कैलास '' ही
कावीळ आहे? डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2204
Wednesday, July 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment