Monday, October 11, 2010

हादरा.. : शाम

कधी आवरावे, कधी सावरावे किती
मी मनाच्याच मागे फिरावे?
घराला घराचे न उरलेच काही कसे
वादळाला अता घाबरावे? नसे आत
जागा नव्या वेदनांना तरी घाव
कोणी नव्याने करावे? रिते आज
सारे झरे आसवांचे कसे
लोचनांनी अता पाझरावे? नभाला
तसे रोज मी पांघरीतो कधी त्या
नभाने मला पांघरावे.. जरा शांत
होता मनाचे किनारे तुझी याद
येता पुन्हा हादरावे.. ( तुझ्या
यौवनाला किती बारकावे कसे दोन
डोळ्यांनि ध्यानी धरावे? )
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment